वार्‍याची छत्री

 

वार्‍याची छत्री


वार्‍या वार्‍या कुठे चालला

घेऊन मोठी छत्री

काळ्या काळ्या मेघांची ही

झाकोळेच धरित्री

 

नभाएवढी गोल गोल ही

फिरवित फिरवित जासी

काळवेळ ना तुलाच काही

दिवस तुला ना रात्री

 

पर्वतमाथ्यावरी घेतसे

छत्रीसवे भरारी

महा खोडकर वात्रट भारी

उतरून जासी दरी

 

गोल गोल फिरविताच छत्री

उडून जाय कुठेही

पडता खाली मेघ रडूनी

वाहू लागे पाणी

 

मेघांच्या त्या छत्रीची ही

पाहुन दैना ऐशी

नभी हसे तो भास्कर गाली

खुदकन हसे धरित्री

------------------------

#लेखणीअरुंधतीची-

Comments

Popular posts from this blog

मोठ्यांची भाषा

लहरी पाऊसराव

पावसाची पाककृती