पावसाची पाककृती पाऊस समजाऊन सांगायचाय चिल्ल्यापिल्ल्या बालमित्रांना छानशा भाषेत ! ढग तयार व्हायची सारी प्रक्रिया, त्यांचे पहिल्यापासून विविध प्रकार Cirro, Cumulo, Strato, Nimbo सांगायचा छोटासा प्रयत्न! आकाशाच्या हंड्यामध्ये । सूर्य बाष्पकण रोज साठव ी तळ्यामधुन वा , मळ्यामधुन वा । जलधीतुन वा, जलकण जमवी सूर्य क ि रण ते, जलबिंदुंसी । नद्यांमधुनही, आणी उचलुनि पाणवठे होतीच कोरडे। जाती विहिरी, बारव सुकुनी वारा घुसळे, बाष्पबिंदु ते । नभाचिया हंड्यात चांगले इथे तिथे मग, दिसू लागती । तुरळक मेघांचे फरकाटे वाटे कुठला, हा सांगाडा । फासळ्याच जणु, मासोळीच्या अजुन काळ काहीच घुसळता । जमिनीवरुनी दिसे नजारा हळु हळु लोणी, येऊ लागे । तसे विस्कळित, ढग्गू गोळे दिसू लागती, आकाशीच्या । भल्याच मोठ्या, हंड्यामध्ये तरिही राही, घुसळत वारा । एकत्रित करि, मेघ-गोलका निळ्या जांभळ्या, तयार होती । आकाशी मग, मेघमालिका आकाशाच्या, काहिलीमधे । नवनीताचे, तूप करावे तसेच पाणी पाणी होई । धरतीवर मग पाऊस येई -----...
Comments
Post a Comment