लहरी पाऊसराव लहरी आहेत पाऊसराव म्हणे बेडुक डराव डराव आम्ही पाहतो यांची वाट खुशाल जातात फिरवुन पाठ।। सलामी द्यायला शेते ताठ हे म्हणती , `` थांबा थोडं पहा वाट ''! दमुन शेतं जातात वाकुन सवडीने हे येतात धावून।। पर्स मध्ये असते छत्री येणार नाहीत बाळगा खात्री ऑफिस , शाळा भरता सुटता धारांचा कारखाना चालू करता ।। -----------
मोठ्यांची भाषा कधी कधी ही मोठी माणसं , काहीतरी भलतच बोलतात असं कसं मला नेहमी, मोठ्या मोठ्या कोड्यात पाडतात आई म्हणते सीताफळं, मोठ्या डोळ्यांचीच चांगली असतात प्रश्न पडतो मला मग, इतक्या डोळ्यांनी कशी पाहतात? प्रत्येक डोळ्यानी वेगळं पाहून , शकतील का सरळ चालू जरा विचारताच मी दटावते आई , डोळे मोठ्ठे करून मला गुलाबाचा डोळा आबा , गांधारीसारखा बांधून ठेवतात. फुटला आता छान म्हणत , हळुच त्याची पट्टी सोडतात चांगल्या डोळ्यावर बांधतात पट्टी, डोळा फुटल्यावर मात्र काढतात का मोठ्यांचं हे वागणं बोलणं , विरीत नाही का? तुम्हीच सांगा थंडीने अंगावर आला काटा तर, आई महणते घाल स्वेटर गुलाबाला बागेमधल्या, मात्र बांधत नाही कधी मफलर जरा नाकाला आलं पाणी तर, आई लावते व्हिक्स बाम चिक येतो म्हणून काढून टाकते, आंब्याचं तर पुरतच नाक चाफेकळीचं नाक काय , हुंगत बसत त्याचाच सुवास? विचारलं तर आजी म्हणते, असे प्रश्न कसे सुचतात? आपल्यासारखच ऐकू येतं , का हो बाबा गोकर्णाला? बाबा म...
Comments
Post a Comment