मटाराच्या शेंगेत
मटाराच्या शेंगेत मटाराच्या शेंगेमध्ये झोपली एक आळी दार केलं बंद तिने गुपचिळीमिळी शेंग उघडली आईने तेंव्हा आळस देत बोलली , `` नका दार उघडू कोणी , होती रात्रपाळी ।। 3 ------------------------------------------ मटाराच्या शेंगेत । बसले आठ दाणे खुशालचेंडु म्हणतात । आहोत चार दुणे वीस मधून करणार । पाहुणे किती उणे शेंगेमधे बसाया । आम्ही आठ दाणे ---------------------------------- #लेखणीअरुंधतीची -