मटाराच्या शेंगेत

 

मटाराच्या शेंगेत


मटाराच्या शेंगेमध्ये झोपली एक आळी

दार केलं बंद तिने गुपचिळीमिळी

शेंग उघडली आईने तेंव्हा आळस देत बोलली,

`` नका दार उघडू कोणी, होती रात्रपाळी ।। 3

------------------------------------------

मटाराच्या शेंगेत बसले आठ दाणे

खुशालचेंडु म्हणतात आहोत चार दुणे

वीस मधून करणार पाहुणे किती उणे

शेंगेमधे बसाया आम्ही आठ दाणे

----------------------------------

#लेखणीअरुंधतीची -

Comments

Popular posts from this blog

लहरी पाऊसराव

मोठ्यांची भाषा

मटकी