Posts

Showing posts from July, 2025

स्वप्ने

  स्वप्ने मूल वर्षाचं झालं की आपोआप चालायचा प्रयत्न करतच आणि थोड्या दिवसात छान चालायला लागत . ते ते वय त्या त्या गोष्टी करायची प्रेरणा देत राहतं . आज्जी झाल्यावर गोष्टी रंगवून सांगायला कोणी शिकवायला लागत नाही . त्या आतूनच येतात . मग कधी कविताही तयार होतात चिल्यापिल्यांसाठी . त्यासाठी शब्द सापडवायला लागत नाही . वृत्त शोधायला लागत नाही . अपसुक गवतफुल फुलल्यासारख्या मनात फुलतात . कुठेही केंव्हाही . एखाद्या लहानग्याने दोन मिनटं त्या इलुशा दिसणार्‍या गवत फुलाशेजारी बसून वाकून पाहता पाहता त्याचा गवतावर तोल जाऊन कोलांटी मारली जावी इतकी छोटीशी अपेक्षा त्या गवतफुलाची असते . तशीच ह्या कवितेचीही ! स्व प्ने स्वप्नांची एक असते गम्मत । पहायला ना पडते किम्मत जागेपणी जे नाहीच जमत । स्वप्नी घडते ते बिनदिक्कत   नियम कोणतेच येथे नसती । उल्टापाल्टा घटनाक्रमही वेडा ठरे   भलताच शहाणा । शहाणा फिरतो दीनवाणा   भिकारी म्हणतो टेचात हाय ! कुबेर म्हणतो पोटाला नाय् ! ...

लहरी पाऊसराव

  लहरी पाऊसराव लहरी आहेत पाऊसराव म्हणे बेडुक डराव डराव आम्ही पाहतो यांची वाट खुशाल जातात फिरवुन पाठ।।   सलामी द्यायला शेते ताठ हे म्हणती , `` थांबा थोडं पहा वाट ''! दमुन शेतं जातात वाकुन सवडीने हे येतात धावून।।   पर्स मध्ये असते छत्री येणार नाहीत बाळगा खात्री ऑफिस , शाळा भरता सुटता धारांचा कारखाना चालू करता ।। -----------  

मोठ्यांची भाषा

  मोठ्यांची भाषा कधी कधी ही मोठी माणसं , काहीतरी भलतच बोलतात असं कसं मला नेहमी, मोठ्या मोठ्या कोड्यात पाडतात   आई म्हणते सीताफळं, मोठ्या डोळ्यांचीच चांगली असतात प्रश्न पडतो मला मग, इतक्या डोळ्यांनी कशी पाहतात?   प्रत्येक डोळ्यानी वेगळं पाहून , शकतील का सरळ चालू जरा विचारताच मी दटावते आई , डोळे मोठ्ठे करून मला     गुलाबाचा डोळा आबा ,    गांधारीसारखा बांधून ठेवतात. फुटला आता छान म्हणत , हळुच त्याची पट्टी सोडतात     चांगल्या डोळ्यावर बांधतात पट्टी, डोळा फुटल्यावर मात्र काढतात का मोठ्यांचं हे वागणं बोलणं , विरीत नाही का? तुम्हीच सांगा   थंडीने अंगावर आला काटा तर, आई महणते घाल स्वेटर गुलाबाला बागेमधल्या, मात्र बांधत नाही कधी मफलर   जरा नाकाला आलं पाणी तर, आई लावते व्हिक्स बाम चिक येतो म्हणून काढून टाकते, आंब्याचं तर पुरतच नाक   चाफेकळीचं नाक काय , हुंगत बसत त्याचाच सुवास? विचारलं तर आजी म्हणते, असे प्रश्न कसे सुचतात?   आपल्यासारखच ऐकू येतं ,   का हो बाबा गोकर्णाला? बाबा म...

मटकी

  मटकी इटुकल्या धिटुकल्या मटक्यांना राग झाला अनावर जरा बांधून ठेवलं तर तलवारी उपसल्या सरासर ।। 1 ---------------------------------------------