स्वप्ने
स्वप्ने मूल वर्षाचं झालं की आपोआप चालायचा प्रयत्न करतच आणि थोड्या दिवसात छान चालायला लागत . ते ते वय त्या त्या गोष्टी करायची प्रेरणा देत राहतं . आज्जी झाल्यावर गोष्टी रंगवून सांगायला कोणी शिकवायला लागत नाही . त्या आतूनच येतात . मग कधी कविताही तयार होतात चिल्यापिल्यांसाठी . त्यासाठी शब्द सापडवायला लागत नाही . वृत्त शोधायला लागत नाही . अपसुक गवतफुल फुलल्यासारख्या मनात फुलतात . कुठेही केंव्हाही . एखाद्या लहानग्याने दोन मिनटं त्या इलुशा दिसणार्या गवत फुलाशेजारी बसून वाकून पाहता पाहता त्याचा गवतावर तोल जाऊन कोलांटी मारली जावी इतकी छोटीशी अपेक्षा त्या गवतफुलाची असते . तशीच ह्या कवितेचीही ! स्व प्ने स्वप्नांची एक असते गम्मत । पहायला ना पडते किम्मत जागेपणी जे नाहीच जमत । स्वप्नी घडते ते बिनदिक्कत नियम कोणतेच येथे नसती । उल्टापाल्टा घटनाक्रमही वेडा ठरे भलताच शहाणा । शहाणा फिरतो दीनवाणा भिकारी म्हणतो टेचात हाय ! कुबेर म्हणतो पोटाला नाय् ! ...